शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा निवड झालेल्या बरोबरच राजीनामा दिला होता, स्थायी समिती सभापती पद न मिळाल्यामुळे नाराज नगरसेवक रवि लांडगे यांनी ताबडतोब राजीनामा दिल्याने सर्वत्र शहरभर या घटनेची चर्चा झाली .भाजप पक्षाला पिंपरी-चिंचवड शहरात मजबुती देण्याचे काम ज्या कुटुंबाने केले त्याच कुटुंबातील व्यक्तीला न्याय न मिळाल्याने रवी लांडगे यांनी हा राजीनामा दिला होता
सत्ताधारी भाजपने आतापर्यंत नगरसेवक रवि लांडगे यांचा स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा मंजूर केला नव्हता , नगरसेवक रवि लांडगे हे कोणत्याही स्थायी समिती सभेला हजर नव्हतेच नुकताच मागील आठवड्यात स्थायी समिती सदस्य पदाचा त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केल्याने स्थायी समिती मधील एक जागा रिक्त झाली होती या जागेवर नगरसेविका सुजाता पालांडे यांची स्थायी समितीच्या रिक्त पदावर सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभेत सत्कार करण्यात आला . यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप उपस्थित होते.