शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी रहाटणी, पिपळे सौदागर परिसरातील नागरिकांना “महाराष्ट्र बंद” च्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील सर्व व्यापारी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी झाले आहेत.
आज सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविकास आघडीच्यावतीने लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ “महाराष्ट्र बंद” चे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रहाटणी पिपळे सौदागर परिसरातील नागरिकांना मा विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी बंदचे आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळण्यात आला व त्यांनी आपली दुकाने बंद ठेवत महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी झाले.