शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या चिंचवड स्टेशन येथील स्मारकाचे नूतनीकरणाच्या कामाला नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. या कामाला नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी पाठपुरावा करून बजेट आणले व हे नूतनीकरणाचे काम वस्ताद लहुजी यांच्या जयंती च्या दिवशी (१४ नोव्हेंबर) पूर्ण करावे, असे आदेश नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे.
Advertisement
कोरोनामुळे हे काम गेल्या दोन वर्षा पासून रखडले होते त्याला सद्या गती देणे आवश्यक असल्याचे गोरखे यांनी म्हटले आहे. या बाबत लवकरच आयुक्तांना भेटून चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
Advertisement