शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने प्रभाग क्रमांक 23 मध्ये सुरू असलेली रस्ते विकासाची कामे ही संथ गतीने सुरू आहेत ही कामे जलद गतीने व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथे गेल्या आठ महिन्यांपासून रस्ते विकासाची कामे सुरू आहेत परंतु ही कामे संथगतीने सुरू आहेत त्यामुळे जागोजागी खोदकाम करण्यात आली असून या कामात दिरंगाई होत आहे तसेच या मुळे अनेक छोटे-मोठे अपघात या रस्त्यांवर आतापर्यंत झाले असून नागरिकांना या अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे त्या मुळे लवकरात लवकर ही कामे पूर्ण करावी.
यावेळी प्रशांत सपकाळ यांनी सांगितले की विकास कामांना आमचा विरोध नाही पावसाळ्यामध्ये आम्ही हे हाल सहन केले पण आता निदान दिवाळी सारख्या सणासुदीच्या तोंडावर तरी या अडचणी नको. नागरिकांना या अडचणींचा मोठ्याप्रमाणात सामना करावा लागत आहे येत्या पंधरा दिवसात ही कामे पूर्णत्वास नेली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी प्रशांत सपकाळ यांनी दिला
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सरचिटणीस अभिजीत आल्हाट सामाजिक कार्यकर्ते दीपक तरडे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शिंदे सामाजिक न्याय विभागाचे अमित गायकवाड व कल्पना आल्हाट, खंडू डावरे इत्यादी उपस्थित होते