शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेले किरण गोसावी यांच्यावर आता आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक केल्याबरोबर पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकाविल्याचेही उघडकीस आले आहे. वानवडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. किरण प्रकाश गोसावी (रा. सानपाडा), त्याचा सहकारी आणि कुसुम गायकवाड (रा. कॅम्प) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
Advertisement
फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी किरण गोसावी याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याप्रकरणी प्रकाश माणिकराव वाघमारे (वय ४८, रा. महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
Advertisement