आमदार लक्ष्मण जगताप यांचा, कोणताही घटक आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच रक्तदान शिबिराचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ डिसेंबर) :- श्री दत्त जयंती निमित्त थेरगाव परिसरातील प्रभाग सदस्य संदीप काशिनाथ गाडे यांच्या संकल्पनेतून आणि मीरा क्लासिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन उद्योजक श्री शंकर शेठ जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बिर्ला हॉस्पिटल मधील रक्त पेढी मधील वैद्यकीय पथकाने या रक्तदान शिबिरातील रक्त संकलनाचे कार्य पार पाडले . यानिमित्ताने १३७ सुजाण नागरिकांनी रक्तदान देऊन सामाजिक भान जपले .
” चिंचवड विधानसभेतील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे आणि समाजातील कुठलाही घटक आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये हा सन्मानीय लक्ष्मण भाऊंचा नेहमीच मानस असतो , भाऊंचा हाच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केल्याचे , प्रभाग सदस्य संदीप काशिनाथ गाडे यांनी सांगितले ” श्री दत्त जयंतीनिमित्त महाप्रसाद देखील आयोजित करण्यात आला होता . ५०० हुन अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
याप्रसंगी , भारतीय जनता पार्टी चे उपाध्यक्ष श्री काळूराम शेठ बारणे ,माजी शिक्षण मंडळ सभापती नगरसेविका मनिषा ताई पवार , नगरसेवक अभिषेक बारणे कैलास बारणे , माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे , संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री नरेंद्र माने , सामाजिक कार्यकर्ते रवी दादा भिलारे , सामाजिक कार्यकर्ते आकाश बारणे ,अतुल घोगरे , अमोल बागुल , संजय ठाकरे , प्रवीण भुसारे , अमोल भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिराचे संपूर्ण नियोजन श्री सुनील जगताप , विनोद मांडवगडे , डॉ. तानाजी करके, तानाजी भोसले , राहुल शिंदे विजय भुसारे , राजू मातेरे , किशोर सकुंडे , निलेश गायकवाड,नामदेवराव नवले , प्रमोद खोसे , गणेश गांधी , बाळासाहेब जगताप , संतोष पोकळे , महिंद्र विटकर , भरत शिंदे , मोनेष पांचाळ , अभिजीत तेलंगे , प्रतिक गाडे निखिल कुर्हडे , मीरा क्लासिक सोसायटी चेअरमन माऊली बालवडकर , कार्यकर्ते सचिन पाटील , अक्षय साळुंखे अनिल देवकर , राजाराम शितोळे ऍड. गोरख लामखडे , ऍड. विठ्ठल सोनार , महेश बोडके , अक्षय ढमाळ , निखिल गायकवाड आदी उपस्थित होते.