शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड स्टेशन परिसरातील आनंद नगर, साईबाबा नगर व चिंचवड स्टेशन येथील रेल्वे परिसरातील रहिवासी नागरिकांना रेल्वे प्रशासन वतीने नोटीस बजावण्यात आली आहे.
अनधिकृत घरांवर कारवाई होणार असल्याची नोटीस नागरिकांना मिळाली आहे, यावर उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने या सर्व नागरिकांचे पुनर्वसन व्हावे या मागणीचे निवेदन माजी नगरसेविका सौ मीनल यादव व शिवसेना विभाग प्रमुख केएम रेड्डी यांच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांना देण्यात आले. या निवेदनात या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन व्हावे तसेच नागरिकांना स्वतःची घरे मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी या परिसरातील नागरिकांनी कोणीही घाबरून जाऊ नये सर्वांचेच पुनर्वसनाची जबाबदारी महापालिकेची आहे व आम्ही सर्व नागरिकांचे पुनर्वसन करू असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले असल्याची माहिती मा. नगरसेविका मीनल यादव यांनी दिली आहे.