शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
धानोरी परिसरातील दगडखाणीतून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या दोन तरुणांचे मृतदेह शनिवारी बाहेर काढण्यात आले. विकी लंके (वय २० ) आणि सुशांत बदाडे (वय २१ , दोघेही रा. विश्रांतवाडी) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, लंके आणि बदाडे हे मित्र होते आणि ते ८ जून रोजी बेपत्ता झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.शनिवारी दुपारी काही स्थानिक रहिवाशांना धानोरी येथील दगडखाणीत दोन मृतदेह तरंगताना दिसले. काही वेळातच पुणे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खदानीतून मृतदेह बाहेर काढला.पोलिसांनी त्यांची ओळख पटवून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून सामान्य रुग्णालयात पाठवले.अधिक तपास सुरु आहे.
Advertisement