शबनम न्युज | मुंबई
निकाल लागल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असून त्यांच्यासोबत जवळपास २५ आमदार उपस्थित असल्याची चर्चा आहे.
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Advertisement
एकनाथ शिंदेंसोबत असणारे आमदार –
- संजय राठोड एकनाथ शिंदेंसोबत असल्याची माहिती आहे.
- अपक्ष आमदार जयस्वाल (रामटेक)
- तानाजी सावंत (उस्मानाबाद)
- ज्ञानराज चौघुले (उस्मानाबाद)
- यवतमाळचे पालकमंत्री भुमरे
- शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
- विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
- बालाजी किणीकर (अंबरनाथ)
- भरत गोगावले (महाड)
- महेंद्र दळवी (अलिबाग)
- महेंद्र थोरवे (कर्जत)
- कृषिमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचेही फोन बंद आहेत.
- सांगोल्याचे ॲड. शहाजीबापू पाटील पूर्वीपासून भाजपाच्या संपर्कात होते. ते आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे.
- खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांचाही सहभाग असल्याची माहिती. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील खदखद त्यांनी मांडली होती.
- कोल्हापूरचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.
- प्रताप सरनाईक यांच्याविषयी संभ्रम कायम आहे
- ठाकरे सरकार कोसळलं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आलं तर करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे हे भाजपाला पाठिंबा देऊ शकतात.