शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान होत असताना महाविकास आघाडी सरकार कोसळले व शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ असणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे एकूण ४० आमदार फोडून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांचे समर्थक. एकनाथ शिंदे यांच्या विषयी अधिक माहिती घेतली असता ते राजकारणात येण्यापूर्वी रिक्षा चालक होते. एक रिक्षाचालक आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाला असल्याचे वक्तव्य करणारे पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. परंतु, हे व्हायरल होणारे पोस्ट यामध्ये ज्या व्यक्तीचे चित्र फोटो व्हायरल करण्यात येत आहे. तो फोटो नेमका एकनाथ शिंदे यांचा नाही तर व्हायरल होणारा हा फोटो पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांची नेते बाबा कांबळे यांचा आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असणारे बाबा कांबळे यांचा हा व्हायरल होणारा फोटो १९९७ मधला आहे. जो आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रिक्षाचालक म्हणून व्हायरल होत आहे. या फोटो मागचे सत्य आम्ही पडताळणी केली असता, हा फोटो कामगार नेते बाबा कांबळे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील बाबा कांबळे हे कष्टकरांचे नेते असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्षही आहेत, त्यांनी या माध्यमातून अनेक रिक्षाचालकांना अनेक वेळा न्याय मिळवून दिला आहे. रिक्षा चालकांची तसेच रिक्षा मालकांची एक मुठ बांधणारे नेते म्हणून पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात बाबा कांबळे यांची ख्याती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा फोटो नसून बाबा कांबळे यांचा फोटो आहे.