शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी येथील संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने मा.नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रभाग क्रमांक २१ मध्ये विविध परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी व बालरोग तपासणी शिबिराचे शिबिराचे आयोजन युवा मंचच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी अधिक माहिती देताना हरिष वाघेरे म्हणाले कि, संदीप वाघेरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा कऱण्यात आला. या निमित्ताने गुरुवर्य श्री.माउली महाराज वाळूंजकर याच्या हस्ते प्रभागामध्ये वृक्षारोपण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.तसेच संदीप वाघेरे जनसंपर्क कार्यालय प्रांगणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तरुणांनी शिबिरास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत ८९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.तसेच नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण १३५ नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना सवलतीच्या दरात तसेच प्रभागातील गरीब गरजू नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. या शिबिरांसाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय रक्तपेढी व डॉ.चाकणे हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे, ह.भ.प.माउली महाराज वाळूंजकर, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, जेष्ठ नागरिक संघ व जेष्ठ नागरिक संस्थाचे सर्व सभासद उपस्थित होते. नगरसेवक राहुल कलाटे,भाऊसाहेब भोईर,राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष अजित गव्हाणे,नवनाथ जगताप,माजी नगरसेवक संतोष कुदळे,भरत लांडगे,संदीप गव्हाणे,पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर,वैद्यकीय अधिकारी विनायक पाटील,संदीप पाटील कुणाल लांडगे, उमेश खंदारे,महापालिका व पूर्व पी.सी.एम.टी. कमर्चारी,पिंपरी परिसरातील सर्व धार्मिक व गणेशत्सोव मंडळे व बहुसंख्य नागरिकांनी, आदी मान्यवरांनी संदीप वाघेरे यांना शुभेच्छा दिल्या.