शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते परंतु आता महिन्यातून दोनच वेळा जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनपा वतीने देण्यात आली आहे.
महापालिका कार्यालयीन कामकाजाच्या प्रत्येक आठवड्यामध्ये केवळ पाच दिवस असल्याने तसेच दर आठवड्याला प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा असल्याने या सभेमध्ये दाखल झालेल्या नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा विहित वेळेत करण्याकरिता पुरेसा अवधी प्राप्त होत नाही, या कारणास्तव क्षेत्रीय कार्यालयाकडून जनसंवाद सभेमध्ये नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी विहित वेळेत निकाली काढण्याकरिता प्रत्येक सोमवार ऐवजी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यास मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवार (दि. १६) रोजी प्रस्तावान्वये मान्यता दिलेली आहे. त्यानुसार या उपरोक्त प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येईल, असेही मनपा वतीने सांगण्यात आले आहे.