बापू कातळे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड okbet cricket betting
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून तसेच महापुरुषांची वारंवार बदनामी करणारे वक्तव्य करीत असल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात आज बंद पुकारण्यात आला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी किवळे गावातही हा बंद कडकडीतपणे पाळण्यात आला. किवळे गावात राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष चिंचवड विधान सभा, बापू कातळे यांच्या नेतृत्वात किवळे गावात हा बंद पाळण्यात आला. तसेच महापुरुषांची बदनामी करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध म्हणून घोषणा देण्यात आल्या. या बंदला किवळे गावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचे बापू कातळे यांच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना उप शहर प्रमुख नवनाथ तरस महाराष्ट्राचे प्रदेश सचिव प्रसाद लिमन, अर्चना राऊत, सचिन सांडभोर, चंद्रशेखर कातळे, महेंद्र दळवी, रविंद्र मळेकर, ज्ञानेश्वर शेळके, संदीप तरस, मक्रांत शिंदे,शुभम येलवार, संतोष तरस,प्रसाद कातळे,संजय तरस, गणेश गाडे, सुनिल कांबळे,सुरेश वैरागर, राज हस्तोडिया,प्रकाश तरस, आणि सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना सहभागी होते.