शबनम न्युज | पुणे
पुणे शहर हे स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते. संपूर्ण शहरात स्वच्छता ही नेहमी दिसून येते. ‘स्वच्छ शहर’ ठेवण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्ते स्वच्छ ठेवावे, तसेच रस्त्यावर राडारोडा करू नये, आणि रस्त्यावर कोठेही राडारोडा आढळल्यास पुणे महानगपालिकेस कळवण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेवतीने करण्यात आले आहे.
पुणे पालिकेने सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राडारोडा आढळ्यास १८०० २३३ ९५९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपले शहर हे स्वच्छ रहावे, रस्त्यांवर नागरिकांनी राडारोडा करू नये, यासाठी वारंवार नागरिकांना आवाहन करण्यात येते. तसेच पुणे महानगरपालिके वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जनजागृती ही करण्यात येते.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर कचरा तसेच राडाराडा होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी, रस्त्यावर कोठेही कचरा टाकू नये, असे आवाहनी पुणे मनपावतीने करण्यात येते.
नागरिकांसाठी जाहीर आवाहन !!
नागरिकांनी आपल्या परिसरात कोठेही राडारोडा आढळल्यास खालील टोल फ्री नंबर वर संपर्क साधावा. १८०० २३३ ९५९५#SWM #PMC #SolidWasteManagement #SwachhSurvekshan2023 pic.twitter.com/NKBpbyBpIU
Advertisement— PMC Care (@PMCPune) December 31, 2022