शबनम न्युज | चिंचवड / पुणे
कसबा विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदार संघ या दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणुकी करिता जोरदार हालचाली वाढल्या असून, भारतीय जनता पार्टी वतीने कसबा विधानसभा मतदार संघात हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्व. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर महाविकास आघाडी वतीने कसबा विधानसभा मतदार संघाकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने रवींद्र धंगेकर, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी वतिने विठ्ठल उर्फ नाना काटे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यात आले आहे.
या निवडणुकीकरिता राष्ट्रवादी वतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, एकनाथ खडसे, फौजिया खान, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, वंदना चव्हाण, अमोल कोल्हे, शशिकांत शिंदे, सुनील अण्णा शेळके, विद्या चव्हाण, निलेश लंके, अमोल मिटकरी, शेख सुभान अली अशी भली मोठी स्टार प्रचारकांची यादी राष्ट्रवादी वतीने जाहीर करण्यात आली आहे.