युवा नेते मनोज भाऊ जरे, व सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा जरे यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन
प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेते मनोज भाऊ जरे व सामाजिक कार्यकर्त्यां नीलिमा जरे यांच्या हस्ते. मोरेवस्ती मधील टॉवर लाईन येथे अंबिका हौसिंग सोसायटी या सोसायटीच्या सभासद नामफलकाचे उदघाटन करण्यात आले.
गेली अनेक दिवसांपासून सोसायटी स्थापन झालेली होती परंतु त्यास कुठल्याही प्रकारची ओळख न्हवती.
काही दिवसांपूर्वी येथील नागरिक व महिला भगिनी यांनी युवा नेते मनोज जारे यांना भेटुन सोसायटीचा सभासद बोर्ड बनवून देण्याची विनंती केली व त्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन मनोज भाऊ जरे यांनी सोसायटी धारकांना नामफलक बनवुन दिले बरेच वर्षानंतर सोसायटीचे नामफलक तयार झाल्याने. नागरिकांनी आनंद व्यक्त केला. अशी अनेक छोटी मोठी कामे मनोज भाऊ जरे यांच्या माध्यमातून मोरे वस्ती तसेच चिखली परिसरात होत आहेत नागरिक आपल्या समस्या मनोज भाऊ जरे यांच्याकडे घेऊन जातात व त्यांच्या माध्यमातून अनेक समस्येचे निराकरण होत असते येणाऱ्या काळात मनोज भाऊ जरे हे या परिसरातील प्रभागाचे प्रतिनिधित्व करतील अशी आशा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
या उदघाटन प्रसंगी सोसायटी मधील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .