माजी नगरसेवक सुरेश भोईर व योगदान प्रतिष्ठानच्या वतीने शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
शब्रम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील सन्माननीय बाब या जागतिक महिला दिनानिमित्त समोर आली आहे चिंचवड येथील कुमारी रमा लटपटे ही मुलगी 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला टू व्हीलर स्पोर्ट्स बाईकवर जगातील 56 देशाच्या प्रवासासाठी रवाना झाली विशेष म्हणजे महाराष्ट्राचा भारतीय संस्कृतीच्या पारंपरिक पोशाख नऊवारी साडी मध्ये सलग एक वर्ष जगभ्रमंती करून पुढील आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशीच रमा लटपटे ही चिंचवड मध्ये परत येणार आहे या संपूर्ण सहासी प्रवासामध्ये ती 56 देशांना भेट देणार आहे
8 मार्च रोजी या प्रवासासाठी रमा लटपटे हिला शुभेच्छा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराच्या माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक सुरेश भोईर माजी नगरसेवक राजेंद्र गावडे माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे माजी नगरसेवक मधुकर चिंचवडे माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह महिला अध्यक्ष उज्वला गावडे महेश कुलकर्णी भारत केसरी विजय गावडे रवींद्र देशपांडे रवींद्र प्रभुणे बाबा भोईर योगेश चिंचवडे सागर चिंचवडे यांच्यासह अनेक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक सुरेश भोईर तसेच योगदान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले.