शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेते स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण भोसरी मतदार संघात महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सादर शिबिराचे आयोजन दत्ता काका साने प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे हि आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले या शिबिरात 700 रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच आरोग्य तपासणी मध्ये यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांचे उपचार, हृदयरोग तपासणी शस्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया उपचार व तपासणी, जनरल शस्त्रक्रिया, मणक्याचे विकार शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करण्यात आले . यामध्ये एकूण *650 महिलांनी पुरुषांनी सहभाग घेतला.सदर महाआरोग्य शिबीर साने चौक येथे रविवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी या वेळेत संपन्न झाले
या शिबिरास भोसरीचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे पाटील शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे , शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे , महिला शहराध्यक्षा कविताताई अल्हाट, नगरसेवक रवी भाऊ लांडगे , नगरसेवक पंकज शेठ भालेकर ,संजयशेठ नेवाळे ,प्रवीणशेठ भालेकर, संगीतानानी ताम्हाणे, विद्याथीअध्यक्षा वर्षा जगताप , मनोज शेठ जरे , विशाल काळभोर, आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली