शबनम न्यूज | पुणे
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाचे शहराध्यक्ष पद तुषार कामठे यांना देण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुषार कामठे यांना नियुक्तीचे पत्र दिले .अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या गटाने भाजपसोबत जाण्यामुळे राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले. एक शरद पवार गट व एक अजित पवार गट, दोन्ही राष्ट्रवादीचे गट पक्ष वाढविण्यासाठी पदाधिकारी यांची नियुक्ती करत आहे. पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो, हा बालेकिल्ला सक्षम व्हावा याकरिता पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मूळचे भाजप नगरसेवक असलेले तुषार कामठे त्यांनी भाजप पक्षात राहून आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या चुकीच्या कारभारावर अनेक वेळा बोट ठेवले व चुकीच्या कारभाराविरोधात आवाज उठविला, बऱ्याच दिवसापासून ते राष्ट्रवादीसोबत जाणार अशा चर्चा होत्या.
त्यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्यासोबत आपण जोमाने काम करू असे तुषार कामठे यांनी सांगितले.
याप्रसंगी पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे ,युवक पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष इमरान शेख ,अजय नानासाहेब शितोळे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, संतोष कोकणे, संजय नेवाळे, काशिनाथ जगताप, काशिनाथ नाकाते, प्रशांत सपकाळ, सामाजिक न्याय अध्यक्ष मयूर जाधव, देवेंद्र तायडे, राजन नायर , मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महेश इंगवले, अमित लांडगे, योगेश कामठे, संतोष कामठे, तेजस शिंदे, महेश कामठे, राहुल कामठे, प्रतीक दळवी, सौरभ गाते ,संजीवनी पुराणिक आदी उपस्थित होते.