शबनम न्युज | मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील प्रस्तावित प्रदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. नार्वेकर हे दक्षिण आफ्रिकेतील घाना येथे होणाऱ्या 66 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेत सहभागी होणार होते. परंतु, आता अचानक त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, शिवसेनेच्या ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर नार्वेकर यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लंडन-जर्मनी दौरा रद्द करण्यात आला आहे. ठाकरे गट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक झाल्यामुळेच हे दौरे रद्द होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा लंडन जर्मनी दौरा रद्द झाला. तर ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रामुळे विधानसभा अध्यक्षांचा घाणा दौरा रद्द झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.
राहुल नार्वेकर 30 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत आफ्रिकेतील घाणा देशाचा दौरा करणार होते. एकीकडे गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित आहे, असे असताना नार्वेकर घानाला जाणार असल्याने वीर्तकांनी टीका सुरू केली होती.