पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, स्वच्छता पंधरवडा – ‘स्वच्छता ही सेवा‘ उपक्रमाअंतर्गत भारती विद्यापीठ इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आयएमईडी) तर्फे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. भिडे पुलानजीक नदी पात्रात स्वच्छता आणि श्रमदान करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील ,आय एम इ डी चे प्रभारी संचालक डॉ. अजित मोरे, उपप्राचार्य डॉ.रामचंद्र महाडिक ,एरंडवणे कॅम्सपसचे सर्व विभागप्रमुख ,प्राध्यापक ,कर्मचारी वर्ग, विद्यार्थी ,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
‘भारती विद्यापीठाचे संस्थापक पतंगराव कदम,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम,कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांची प्रेरणा तसेच डॉ.अस्मिता जगताप (संचालक,भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशन) यांचे मार्गदर्शन आयएमईडीला या उपक्रमात मिळाले.स्वच्छता आणि सेवेचे उपक्रम नेहमी सुरु राहतील’,असे उद्गार आयएमईडीचे प्रभारी संचालक डॉ.अजित मोरे यांनी यावेळी बोलताना काढले.रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला.