शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे सर्किट हाऊस येथे पिंपरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामा बाबत बैठक पार पडली.पिंपरी विधानसभा क्षेत्रातील जुन्या मुंबई पुणे हायवे वरील हॅरिस ब्रिज ते एम्पायर इस्टेट व एम्पायर इस्टेट ते भक्ती शक्ती या दोन टप्प्यात अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार होणाऱ्या रस्त्याचे सादरीकरण करण्यात आले.यामध्ये दोन लेन मध्ये सर्व्हिस रोड,नागरिकांना पादचारी मार्ग,गार्डन,सुशोभित पथदिवे,सायकल ट्रॅक,अपघात होणार नाही अशा पद्धतीने एन्ट्री एक्झिट पॉईंट,पादचारी मार्गावर पार्किंग अथवा अतिक्रमण होणार नाही अशी व्यवस्था याबाबत सविस्तर सादरीकरण झाले.या सोबतच आकुर्डी निगडी प्राधिकरण येथील सेक्टर 24,25,26,27,27A व 28 येथे होणाऱ्या हरित सेतू प्रकल्पाचे देखील सादरीकरण करण्यात आले.यामध्ये देखील रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग, पेंटेड सायकल ट्रॅक,सुसज्ज पादचारी मार्ग,आकर्षक पथदिवे,वैविध्यपूर्ण बैठक व्यवस्था व पर्यावरण पूरक झाडे लावण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.हरित सेतू प्रकल्पासाठी ब्लूमबर्ग परोपकार हा 4 लाख डॉलर चे बक्षीस मिळणारा प्रकल्प असल्याने तातडीने प्रकल्प पूर्ण करावा अशी सूचना अजित पवार यांनी केली.
या बैठकीस पिंपरी विधान सभेचे आमदार अण्णा बनसोडे , विभागीय आयुक्त सौरभ राव,जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख,पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह,सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे,कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड,मॅप्स ग्लोबल सिव्हीक टेक लिमिटेड चे संचालक अरविंद पाटील,वास्तुविशारद प्रसन्न देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते.