शबनम न्युज | मुंबई
गुजरात टायटनचा कर्णधार हार्दिक पांड्या याची घर वापसी झाली असून, आगामी हंगामात तो मुंबईच्या ताफ्यात खेळताना दिसणार आहे. ट्वेंटी-ट्वेंटी लीग अर्थात आयपीएल मध्ये हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्स कडून खेळणार आहे.
दरम्यान, हार्दिक पांड्याचे नेतृत्वात 2022 मध्ये गुजरात संघ चॅम्पियन झाला होता. तसेच त्याच्या पुढच्या हंगामात गुजरातला उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. मागील काही दिवसांपासून हार्दिक गुजरातची साथ सोडण्याचा तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत होता. आता यावर शिक्कामोर्तब झाला असून अधिकृत रित्या तो मुंबईच्या फ्रंचाईजीचा सदस्य झाला आहे.
Advertisement