शबनम न्युज | पुणे
बाहन निर्मिती आणि नावीन्यपूर्ण संकल्पनाचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात इंडिया इंटरनेशनल ईव्ही शो (आयआयईव्ही) या देशातील सर्वात भव्य ईव्ही प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होणे अपेक्षित असून १ ते ३ डिसेंबर २०२३ या कालावधीत ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, पिंपरी-चिंचवड, पुणे येथे हा कार्यक्रम होईल. या तीन दिवसांत पुणे नाविन्यता, हरित तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाचे केंद्रस्थान ठरेल.
सातत्याने विकसित होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील नवकल्पना, पर्यावरणपूरक वाहतूक उपाय आणि दूरदर्शी उपक्रम यांचे प्रदर्शन यावेळी होणार आहे. ‘आयआयईव्ही च्या माध्यमातून अपादक, प्रयोगशील आणि नेतृत्वशील उद्योजकांना शाश्चत गतिशीलतेच्या विशाल क्षमतेचा शोध घेण्यासाठी भव्य व्यासपीठ निर्माण होणार आहे आयआयईव्ही २०२३ मध्ये २०० हून अधिक प्रदर्शक संपूर्ण भारत आणि जगभरातील २०००० हून अधिक अभ्यागतांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. बाहन क्षेत्रातील हा सर्वांत महत्त्वाचा मेळावा असून यामुळे उपस्थितांना ईव्ही उद्योगाबद्दल खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टिकोन मिळेल.
प्रदर्शनात ७००० हून अधिक विक्रेते, वितरक, अधिकृत परवानाधारक सहभागी होणार असून ३००० हुन अधिक उत्पादने आणि सेवांची यावेळी प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. तसेच ३० हून अधिक नवीन उत्पादनांचे यावेळी प्रक्षेपण होणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे ‘आयआयईव्ही’ नावीन्यतेचे केंद्रस्थान बनणार आहे. साल २०३० पर्यंत जागतिक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचे नेतृत्व करण्याचे भारताचे उद्दिष्ट असून यातूनच शाश्वत भविष्यासाठी भारताची भूमिका समोर येते.
“भारताची इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ आता मर्यादित राहिलेली नाही; हा उद्योग भरभराटीचा असून त्याने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात सध्या अंदाजे २.८ दशलक्ष इलेक्ट्रिक वाहने वापरात असून ही बाजारपेठ अधिक वाढीसाठी सज्ज झाली आहे. वर्ष २०३० पर्यंत ९४.४ टक्के अशा उल्लेखनीय चक्रवाढ वार्षिक वाढीचा (सीएजीआर) अंदाज असून यातून हे निदर्शनात येते की, इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढतो आहे आणि यातूनच शाश्वत विकासासाठी देशाची वचनबद्धता अधोरेखित होते,” अशी माहिती फ्युचर्स ग्रुप (इव्हेंट ऑर्गनायझिंग कंपनी) चे संचालक नमित गुप्ता यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षात (२०२२-२३) इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत २०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, २०२१- २२ मध्ये ८,६६८ वाहनांची नोंद झाली होती. प्रमुख वाहन निर्मिती केंद्र असलेले पुणे इलेक्ट्रिक वाहनातील संशोधन, नावीन्यता आणि उत्पादनात आघाडीवर आहे. इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेच्या वाढीमागे उत्पादन, संशोधन आणि विकासातील पुण्याचे कौशल्य हे प्रेरणादायी आहे, ज्यामुळे आयआयईव्ही’चे आयोजन करण्यासाठी हे उत्तम स्थळ आहे. ‘आयआयईव्ही’मध्ये उपस्थितांना अद्ययावत ईव्हीचा अनुभव घेण्याची, तज्ज्ञांशी संवाद साधण्याची आणि इलेक्ट्रिक वाहतुकीचे भविष्य शोधण्याची संधी मिळेल. या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम, चर्चासत्रे, नेटवर्किंग यांचा अनुभव घेता येणार आहे तसेच उत्पादक पर्यावरण प्रेमी तंत्रज्ञान प्रेमी धोरण रचनाकार आणि वाहनप्रेमींना आकर्षित करणारा हा कार्यक्रम आहे आय आय टीव्ही शाश्वत वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यावर ईबीच्या सकारात्मक परिणामाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी समर्पित असून शाश्वत भविष्यासाठी योगदान देणारे आहे.
फ्युचर्स ट्रेड फेअर अँड इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे ही कंपनी आपल्या ग्राहकांच्या अद्वितीय व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यात आवश्यक आणि प्रभावी उपाय प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे विविध प्रदर्शने परिसंवाद कार्पोरेट इव्हेंट्स आणि गेट-टुगेदर यासारख्या व्यावसायिक व्यासपीठावर त्यांची टीम समर्पितपणे काम करताना दिसते त्यांचे हे उल्लेखनीय काम व्यावसायिकांना संभाव्य खरेदीदार आणि उद्योग तज्ञांची जोडण्याची भूमिका पार पाडते.