शबनम न्युज : पुणे
देशाची राजधानी दिल्ली मध्ये डीके पीजेंट संस्थेने आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेत पुण्यातील डॉ. श्रावणी शहापुरे या ‘प्राइड ऑफ इंडिया मिसेस इंडिया २०२३‘ मुकुटाच्या जी-२ श्रेणीतील विजेत्या ठरल्या.देशभरातील विविध राज्यांतील स्पर्धक सहभागी झाले.त्यांना मिसेस इंडिया मुकुट प्रदान करण्यात आला,सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.भारतातील प्रतिष्ठेची राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा असणाऱ्या ‘प्राइड ऑफ इंडिया’ मिस, मिसेस आणि मिस टीन इंडियाच्या राष्ट्रीय विजेत्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांनी सुंदर ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करून प्रतिभेची चुणूक दाखवली. ज्यामध्ये डॉ. श्रावणी शहापुरे यांना ‘मिसेस इंडिया प्राईड ऑफ इंडिया २०२३ ‘च्या विजेत्या म्हणून सन्मानित करण्यात आले .
सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा अनोखा मिलाफ,आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. श्रावणी या क्रिप्टोग्राफीमध्ये पीएचडी आहेत. त्या बहुराष्ट्रीय संस्थेसाठी काम करतात. सायबर गुंडगिरीविरुद्ध सामाजिक जागृती करण्यासाठी त्या या व्यासपीठाचा वापर करू इच्छितात.
कार्यक्रमात बोलताना डीके पीजेंट संस्थेचे संस्थापक, जिमी ई गरिमा म्हणाले की, ‘हे सर्व विजेते राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीतील स्पर्धक आहेत. प्राईड ऑफ इंडिया ब्युटी पीजंट प्रत्येक स्त्रीला त्यांची उंची, वजन किंवा वय याच्या आधारावर भेदभाव न करता त्यांची प्रतिभा दाखवण्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करते. महिला सक्षमीकरणासाठी ही सौंदर्य स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.३ दिवस चाललेल्या या मेगा सौंदर्य स्पर्धेमध्ये विजेत्यांच्या पारितोषिक वितरण समारंभासह त्यांच्या पोर्टफोलिओ शूट अॅक्टिव्हिटीही करण्यात आल्या‘.