शबनम न्युज | लोणावळा
मराठा आरक्षण शांतता घेऊ द्या, मग विरोध करणाऱ्या एका एकाला पाहतो. आपल्या विरोधकांची वळवळच बंद करतो. ही एकजूट अशीच कायम ठेवा, मी तुमचा शब्द मोडणार नाही, तुम्ही मला शब्द मोडू नका. मी सुद्धा अपमान पचवला आहे, सगळ्यांची हिशेब होणार, मात्र आधी आरक्षण मिळाल्यावर. आजूबाजूला लक्ष ठेवा, असे मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटल आहे.
आतापर्यंत आपण शांततेत आंदोलन केला आहे. एकाही पोरांनी गडबड केली नाही, होऊ पण दिली नाही, मराठा शांत आहे, दिलेला शब्द पाळणारे आहेत, हे माझ्या मायबाप समाजाने राज्याला सिद्ध करून दाखवलं. मुंबईतही आम्ही शांततेत जाणार, शांततेत बसणार, गडबड करणार नाही, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जरांगे पाटील मुंबईला निघाले आहेत. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. अशातच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला जे विरोध करणारे आहेत, ज्यांनी अपमान केला, त्यांचा हिशोब चुकता करणार असल्याचे म्हंटले आहे.