शबनम न्यूज प्रतिनिधी
शरद पवारांना निवडणूक आयोगाने मोठा राजकीय धक्का दिला असून अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. परंतु निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग आता प्रशस्त केल्याने आमदार अपात्रता चा निर्णय अजित पवारांच्या बाजूने जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून उद्यापर्यंत शरद पवार गटाला चिन्ह बाबत कळविण्यात सांगण्यात आलं आहे निवडणूक आयोगाने म्हटल्याप्रमाणे अजित पवारांकडेअसलेला पक्ष हा खरा पक्ष आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार वापरतील , उद्या सात फेब्रुवारी पर्यंत शरद पवार गटाने पक्षाचे नाव आणि चिन्ह सुचवावं , पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Advertisement