शबनम न्यूज प्रतिनिधी,
मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही पण बारामतीचे लोक समजदार आहेत ते योग्य निर्णय घेतील असे शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी बारामती मध्ये भाषण करताना सांगितले की आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी वतीने ही शेवटची निवडणूक असल्याचे सांगत मतदारांना भावनिक आवाहन करण्यात येईल याच संदर्भात एका पत्रकाराने विचारलेलय प्रश्नांना उत्तर देत शरद पवार यांनी स्पष्ट केले की मी निवडणूक लढविणार नाही बारामतीचे मतदारच योग्य निर्णय घेतील.
बरेच दिवसापासून चर्चा आहे की बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार उमेदवार देतील परंतु जर बारामतीत शरद पवार हेच उमेदवार असतील तर अजित पवारांना बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करणे अवघड जाईल परंतु आज शरद पवार यांनी मी निवडणूक लढविणार नाही असे स्पष्ट केल्याने आगामी काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे उमेदवार असतील हे निश्चित मानले जात आहे तर अजित पवार आपल्या राष्ट्रवादी वतीने कोणता असा सक्षम उमेदवार उभे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल