गृहपोयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी रहाटणीत स्टॉलचे उद्घाटन ..
सवलतीच्या दरात गृहपोयोगी वस्तू खरेदी करा; चंद्रकांत नखाते यांचे आवाहन…
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- भाजपचे जेष्ठ नेते तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा. नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त राजदादा तापकीर व शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच यांच्या सहकार्याने रहाटणी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या वस्तू सवलतीच्या दरात मिळाव्यात यासाठी पुढाकार घेत सवलतीच्या दरात गृहपोयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. त्यात टीव्ही, फ्रीज, आरओ वाटर प्युरीफायर, कुलर यासह विविध वस्तूंचा समावेश आहे.
या सर्व वस्तू खरेदीसाठी परिसरातील नागरिकांना ७० टक्के इतकी सवलत देण्यात आली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. वस्तू खरेदीसाठी प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्वस्त दरात वस्तू मिळत असल्यामुळे नागरिक चंद्रकांत आण्णा नखाते यांचे आभार मानत आहेत.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, शहराध्यक्ष शंकर जगताप, मा.नगरसेवक शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेंडगे, संदीप कस्पटे, शंकर आप्पा नढे, माऊली नढे आदी मान्यवरांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
चंद्रकांत आण्णा नखाते म्हणाले, रहाटणीगावचा ग्रामस्थ या नात्याने प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. प्रभागातील विविध समस्या आणि नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर नेहमी भर दिला आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यातीलच हा एक उपक्रम आहे. या उपक्रमास नागरिकांची मोठी पसंती मिळत आहे. राजदादा तापकीर, शुभम नखाते, सुनील नखाते, अमोल नखाते, युवराज नखाते या संयोजक टीमच्या नाविन्यपूर्वक कल्पनेमुळे माझा वाढदिवस हा मोठ्या प्रमाणात उत्सवदिन म्हणून परिसरात सर्वत्र साजरा होत आहे. नागरिकांनी या स्टॉलला भेटी देऊन सवलतीच्या दरात गृहपोयोगी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन चंद्रकांत नखाते यांनी केले आहे.