शबनम न्यूज , प्रतिनिधी :
चिंचवड :- नवीन हिमोफिलिया या आजाराबाबत विधान परिषद आमदार उमा खापरे यांनी माहिती घेतली हिमोफिलिया या आजारामध्ये पेशंटला वारंवार सांध्यांमध्ये रक्तच्राव झाल्यामुळे सांधे निकामी होतात व पेशंटला कायमस्वरूपी अपंगत्व येते.
या नवीन हिमोफिलिया आजारावर उपचार केंद्र असावेत याकरिता आमदार उमा खापरे यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत लक्षवेधी ठरावाच्या वेळी हा प्रश्न उपस्थित केला व या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी सर्व तालुकास्तरावर उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी सरकारकडे मागणी केली त्यांच्या या मागणीला सकारात्मकता दाखवत महाराष्ट्रात 27 ठिकाणी सरकारी रुग्णालयात डे केअर ची सुविधा उपलब्ध झाली आहे. असे उमा खापरे यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
या संदर्भात अधिक बोलताना आमदार उमा खापरे यांनी सांगितले की चिंचवड मधील डॉक्टर सुनील लोहाडे हे आमचे जवळचे परिचित आहे व वेळोवेळी भेट होत असताना बराच वेळा त्यांनी हिमोफिलिया या आजाराबद्दल माहिती दिली या आजारात पेशंटला कायमस्वरूपी अपंगत्व येते हे ऐकून आपल्या मनाला खूप वेदना झाल्या आपण या रुग्णांसाठी काहीतरी करावं अशी मनात भावना निर्माण झाली . एकदा एका हिमोफिलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले असता तेथे जवळपास 150 ते 200 लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आले, त्यावेळी आमदार उमा खापरे व पेशंट व त्यांचे पालक यांच्याशी बऱ्याच विषयावर चर्चा झाली, काही पेशंट तर लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या दूरच्या ठिकाणाहून आले होते. महाराष्ट्रात अंदाजे साडेचार ते पाच हजार रुग्ण आहेत आणि खूप ठिकाणी याच्या सुविधा उपलब्ध नाहीत या आजारासाठी लागणारी इंजेक्शन ही खूप महाग असून त्याची फारशी उपलब्धता नाही जवळपास 90% पेशंटयांना विकत घेणे शक्य नसते त्यामुळे सरकारमार्फत या इंजेक्शन उपलब्ध व्हाव्यात या रुग्णांमध्ये येणारे अपंगत्व टाळता यावे असे मला वाटले व मी हिमोफेलिया रुग्णांसाठी काम करण्याची ठरविले व सध्या या रुग्णांसाठी तालुकास्तरावर उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी आपण सरकारकडे मागणी केली आहे अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी दिली