शबनम न्यूज / पिंपरी
आज जागतिक डॉक्टर्स डे साजरा होत आहे. या निमित्ताने आज अनेक ठिकाणी डॉक्टरांचा सन्मान सत्कार करण्यात येत आहे. मागील दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटमय काळात अनेक अडचणींचा सामना करत आहोत. या अडचणीच्या काळात डॉक्टर वर्ग हे देवदूत म्हणून कोरोना रुग्णांची सेवा करीत आले आहे. या डॉक्टर डे निमित्त यांचे विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता त्यांचा आज मोठ्या प्रमाणात सन्मान करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील युवा नेते निलेश बोराटे यांनी या डॉक्टर डे निमित्त मोशी परिसरातील सर्व डॉक्टर व नर्सेस यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. व या कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या अविरत रुग्ण सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचले. याबद्दल त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करीत सत्कार केला. यावेळी युवा नेते निलेश बोराटे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.