शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते पांडा यांच्या यांच्या प्रयत्नाने मोरेवस्ती भागातील रहिवासी व नागरिकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. काही दिवसांपूर्वीचं मोरेवस्ती भागातील साने कॉलनी रस्त्याचे काम पूर्ण झाले होते; परंतु रस्त्याचे डांबरीकरण करताना स्टॉर्म वॉटर लाईन तसेच ड्रेनेज लाईन चेंबर्स या रस्त्याच्या समपातळीत नसल्यामुळे काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी अडथळा निर्माण झाला होता. यामुळे सदर रस्त्यावर वारंवार अपघाताचे प्रकार घडत होते. सदर विषयाची स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते पांडा साने यांच्या कडे तक्रार केली.
याची दखल घेत भोसरी विधानसभेचे दमदार आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच फ प्रभाग अध्यक्ष नगरसेवक कुंदन गायकवाड यांच्या सहकार्याने संबंधित पालिका अधिकारी व कंत्राटदार यांच्या मार्फत स्टॉर्म वॉटर लाईन आणि ड्रेनेज लाईन चेंबर्सच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात आले .
तसेच सदर काम व्यवस्थित करून घेण्याच्या पालिका अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराला पांडासाने यांनी सूचना दिल्या.या भागातील नागरिकांनी पाण्याचा आणि यांचे या निमित्त आभार व्यक्त केले