शबनम न्युज | पुणे
ज्येष्ठ व्यंगचित्रकार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना श्रीसाई प्रतिष्ठान संस्थेतर्फे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ चौधरी यांच्या शुभहस्ते नुकताच ऑनलाईन ‘व्यंगचित्रकार कला जीवन.गौरव पुरस्कार 2021’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राधाकृष्ण इंटरनॅशनल.च्या सहनिमंत्रक सौ.प्रतिमा काळे, अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्या सहसचिव सौ.राजश्री मराठे,साहित्य गौरव संस्थेचे सहसचिव यशवंत गरड आदि मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.मधुसूदन घाणेकर हे एकपात्री कार्यक्रम, ज्योतिष, हस्ताक्षर मनोविश्लेषण, लघुपट, अनुबोधपट, अभिनय,दिग्दर्शन, अक्षर रेखाटन, संपादन, अध्यात्म, सामाजिक कार्य आदि अनेक क्षेत्रात 4 तपाहून अधिक काळ कार्यरत असून या सर्व क्षेत्रांची व्यंगचित्रांशी सांगड घालत असतात. त्यांची व्यंगचित्रांची प्रदर्शने भरवली आहेत.अनेक दिवाळी अंक, मासिकांमधून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. माझा अल्बम,चपराक अशी व्यंगचित्रांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी त्यांच्या व्यंगचित्रांचे काही डहाळी विशेषांकही काढले आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांचा
देशविदेशातील प्रसिद्धी माध्यमांनीही गौरवले आहे.या दैदीप्यमान कर्तबगारीवर ,डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना व्यंगचित्रकार कला जीवन.गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याचे श्रीसाई प्रतिष्ठान चे
संस्थापक.अध्यक्ष संजयभाऊ चौधरी यांनी सांगितले.