शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
नागरवस्ती विकास योजना विभागातील महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत असलेल्या महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम या योजनेअंतर्गत होणारे प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका नम्रता योगेश लोंढे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नागरवस्ती विभागातील महिलांसाठीच्या योजनेला यावर्षी खूप उशीर झाला असून, गरजू महिलांना या कोर्सेसची अत्यावश्यकता भासत आहे व आपल्या योजनेचा लाभ शहरातील खूप महिलांना होत असतो. या वर्षी या कोर्सला पाच ते सात महिने उशीर झाला आहे. आपल्याला यामध्ये ज्या नियम व अटी लावायचे आहेत ते आपण लवकरात लवकर लावा, परंतु हे कोर्सेस लवकर चालू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात यावे, असेही नगरसेविका नम्रता लोंढे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.