प्रशासनाची टॅब खरेदीसाठी चालढकल
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
ऑनलाइनच्या जमान्यात महापालिकेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना टॅब खरेदी करण्यासाठी तीनवेळा प्रस्ताव दिला होता. परंतू टॅब खरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी मागील दोन वर्षापासून अद्यापही ४० टक्के मुले साधनांअभावी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर आहेत.
खासगी शाळांच्या तुलनेत महापालिका प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची दयनीय अवस्था सर्वश्रृत आहे. महापालिकेच्या शहरी भागातील शाळांपेक्षा ग्रामीण भागातील शाळांमध्ये परप्रांतीय,परभाषिक , परराज्यातील , गरीब- एमआयडीसी कामगार , मजूर यांची मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने स्मार्ट फोन घेण्यापासून त्यांची पंचाईत आहे. त्यामुळे त्यांची मुले ऑनलाइन शिक्षणापासून दूरच आहेत. शहरी शाळांमधील काही पालकांनी मुलांना जुना मोबाईल घेउन दिला. त्यामुळे त्यांची ऑनलाइनतास शिक्षण होत होते. पण अद्यापही ग्रामीण भागातील काही मुलांकडे साधन नसल्यामुळे मागील दोन वर्षाचे शिक्षण वंचित राहिलेल्याची वस्तुस्थिती आहे.
ही आहे महापालिका शाळांची वस्तुस्थिती
दोन वर्षाच्याकाळात सर्वांपर्यंत शिक्षण ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने पोहोचविण्याचा , गरीब मुलांपर्यंत समाजमाध्यमातून,सोशल मीडियातून, शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण प्रशिक्षणे दिली. त्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न केला. सर्व अधिकारी व पदाधिकारी जिल्हा परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(DIET)कडील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पहिले आहे. आणि यानंतर अजूनही शिक्षणापासून वंचित गरीब मुलांसाठी प्रशासन, शासनाकडून सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम (सीएसआर)संस्थांकडून मुलांना टॅब मिळण्यासाठी अनेक शिक्षकांनी प्रयत्न केला आहे.
कोट
‘‘सलग दोन वर्ष मुलांच्या ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणासाठी शिक्षक प्रयत्न करत आहेत. शिक्षण समितीने आयुक्त, उपआयुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे वेळोवेळी असे तीन वेळेस प्रस्तावही दिले आहेत. सर्वांना शिक्षणासाठी टॅब आवश्यक असून तो मुलांना देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’’
-मनिषा पवार, सभापती, शिक्षण समिती
कोट
‘‘शाळा जरी ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार असतील, तरीही टॅबलेट मुलांना देण्याच्या ऐवजी मुलांच्या संख्येप्रमाणे प्रत्येकी शाळेला देऊ शकतात. टॅबलेट शाळेमध्ये ठेवले तरीआणि शाळा जरी सुरू झाल्या तरी पुढचेभविष्यातील शिक्षण शाळेमधील टॅब वरती विद्यार्थी करू शकतात, मुलांना घरीच दिले पाहिजे असे काही नाही.’’
-संजय येणारे, अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ
‘‘सोनवणे वस्ती शाळेतील ज्या विद्यार्थ्यांकडे कोणतेच साधन उपलब्ध नाहीत किंवा या मुलांपर्यंत ऑनलाइन शिक्षण अजूनही पोहोचले नाही. त्यांच्यासाठी कसे धडपडत आहोत किंवा टॅब मिळेपर्यंत प्रयत्न करत आहे. काही सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे.’’
-दयानंद यादव, शिक्षक,चिखली -सोनवणे वस्ती शाळा
प्रस्तावानुसार आकडेवारी
-प्राथमिक विभाग शाळा -१०५
-पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्या -१८ हजार १८९
-शिक्षक संख्या-१ हजार २८
-माध्यमिक विभाग शाळा-१८
-पाचवी ते दहावी विद्यार्थी संख्या – ७ हजार ९३७
-शिक्षक संख्या -१७०