आपला प्रभाग सुशोभित व्हावा या दृष्टिकोनातून प्रभागातील झाडांना इको फ्रेंडली रंगाने रंगरंगोटी
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शीतल विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात विविध विकास कामांना गती मिळाली आहे. आपला हा परिसर अधिकाधिक विकसित करणे व सुशोभित करणे या संकल्पनेतून संपूर्ण प्रभाग सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर करण्यात येत आहे. त्यानुसार येथील रस्ते सुद्धा सुशोभित करण्यात यावे, असा दोघांचा मानस. त्यानुसार प्रभागातील कोकणी चौक ते जगताप डेअरी चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झाडांना इकोफ्रेंडली रंगाने ज्याचा झाडावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. अशा रंगाचा वापर करून रंग रंगोटी करण्यात आली. त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात अधिक भर पडली येत्या काही दिवसात रहाटणी, पिंपळे सौदागर मधील परिसरात किंवा रस्त्याच्या कडेला असणारी झाडे यांना देखील अशाच प्रकारे रंगरंगोटी देऊन सुशोभिकरणाचे काम करण्यात येणार असल्याचे यावेळी नाना काटे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.