शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ नोव्हेंबर ) :- पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांनी पुणे दौऱ्यात दीड महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांची महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासोबत बैठक घेतली. नगरसेवकांच्या कामाचा आढावा घेताना शिवसेनेच्या नगरसेवकांची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी आयुक्त विक्रमकुमार यांना केल्या.
त्यानंतर पुणे जिल्हा संपर्कप्रमुखपदी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली, पिंपरी चिंचवड तसेच पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पक्षाने आधीच तयारी सुरू केली आहे. पक्षाचे नेते सचिन अहिर व अदित्य शिरोडकर यांच्याकडे पुणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
शिवसेना नेत्यांनी जुन्या चुका दुरूस्त करण्याची भूमिका घेतली असावी. त्यामुळे ठाकरे यांच्या जवळच्या सचिन अहिर व शिरोडकर यांना पुण्याची जबाबदारी दिली असावी, आणि त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांचे शिवसैनिकांच्या वतीने दापोडी मध्ये जोरदार स्वागत करून, त्यांना पिंपरी चिंचवड ” स्मार्ट सिटी प्रकल्पाचा भ्रष्टाचार संदर्भात इडी मार्फत चौकशी व्हावी, म्हणून नागरिकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले.
या भेटीच्या वेळी तुषार नवले पिंपरी चिंचवड शिवसेना उपशहर प्रमुख, सुषमा अजित शेलार युवती युवासेना पिंपरी चिंचवड, निलेश हाके, विभाग प्रमुख राजू भाऊ सोलापूरे, महिला विभाग प्रमुख कोमलताई जाधव, शाखा प्रमुख महेंद्र तांबे, विनोद जाधव, उप शाखा प्रमुख सुनिल ओव्हाळ, इतर आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.