शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :- भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस पिंपरी-चिंचवड शहरात येत्या 27 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेविका सौ स्विनल ताई कपिल म्हेत्रे व माजी नगरसेवक श्री सुरेश (तात्या) म्हेत्रे यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ रंगला पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
हा कार्यक्रम शनिवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी व रविवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गजानन म्हेत्रे उद्यान व मैदान म्हेत्रे वाडी चिखली येथे आयोजित होणार असून या कार्यक्रमात महिलांचे कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच महिलांचा आवडता खेळ गप्पा, गोष्टी, गाणी हास्यविनोद, आर्केस्ट्रा सह मनोरंजन असे कार्यक्रम या खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात होत आहे.
या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबतच शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजाताई महेश लांडगे या प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन ओजा हे करणार असून प्रभागातील, प्रत्येक सोसायटीतील या महिलांना खेळामध्ये सहभागी होण्याची संधी व आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार आहेत तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी घेऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक सुरेश (तात्या) म्हेत्रे यांनी केले आहे या आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस टीव्ही, दुसरे क्रमांकाचे बक्षीस फ्रिज, तिसरे क्रमांकाचे बक्षीस ओव्हन, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस नाकातील दागिना तसेच या कार्यक्रमात उत्कृष्ट खेळ करणाऱ्या 51 महिलांसाठी पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे ,तसेच या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या पैकी 21 महिलांसाठी लकी ड्रॉ आधारे पैठणी बक्षीस देण्यात येणार आहे.
तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे ,तसेच कैवल्य पल्लवी प्रतीक ताम्हाणे या बालकाच्या वाढदिवसानिमित्ताने बाल जत्रा गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर सायंकाळी चार ते आठ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमातही बालकांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.