शबनम न्युज : पुणे (दि.३१ डिसेंबर) :- न्यू युनिक फाउंडेशन (New Unique Foundation) तर्फे दरवर्षी गौरव समारंभ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . तसेच यावर्षी देखील न्यू युनिक फाउंडेशनच्या माध्यमातून “गौरव समारंभ 2021” या कार्यक्रमामध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुज्जम्मील शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त धायगुडे साहेब,संचालक व सचिव रकीब पटेल, खजिनदार अ बासित पटेल, सभासद मुबशीर शेख आदी मान्यवर उपस्थितीत होते.
सन्मानित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे खालील प्रकारे
1 – प्रमोद यादव साहेब भा प्र से, व्यवस्थापकीय संचालक सैनिक कल्याण विभाग व मेस्को विभाग. 2 – माजी कर्नल प्रशांत वानखेडे, महाव्यवस्थापक मेस्को विभाग, 3 – लेफ्टनंट कर्नल आर आर जाधव, प्रशासन अधिकारी सैनिक कल्याण विभाग, 4 – किरण सरोदे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सेंट मेरी उपविभाग पुणे. म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. 5 – विजयकुमार माने, कनिष्ठ अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. 6 – रोहित तेंडुलकर पश्चिम महाराष्ट्र क्लस्टर हेड HDFC बँक.
7 – राहुल म्हामाणे, शाखा व्यवस्थापक HDFC बँक कात्रज शाखा, 8 – तुषार कोठारी, (CA), संस्थापक के जे एस अँड असोसिएट्स, 9 – स्टार्टअप कन्सल्टन्सी सर्व अधिकारी व कर्मचारी. 10 – डॉ सोहेल खान, (MBBS & MS), व्यवस्थापकीय संचालक सना हॉस्पिटल, 11 – डॉ अतिक शेख, डॉक्टर सना हॉस्पिटल, 12 – विजय कुमावत, शाखा अभियंता पुणे मनपा, 13 – सुनील पाटील, सहाय्यक अभियंता सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित,14 – तमराज बडगे, वरिष्ठ तंत्रज्ञान सेंट मेरी उपविभाग, म.राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.