१० जानेवारी रोजी पुण्यात आयोजन
शबनम न्यूज : पुणे (दि.०६ जानेवारी) :- ‘कार्बन न्यूट्रल पुणे मेट्रोपोलिटन रिजन’ या विषयावर ‘तालानोआ डायलॉग’ ही गोलमेज परिषद पुण्यात सोमवार,१० जानेवारी रोजी दुपारी एक ते पाच या वेळात होत आहे.
समुचित एन्व्हायरो टेक,लया रिसोर्स सेंटर,इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज,सीसीपी एन्व्हायरोमेंटल फाउंडेशन आयोजित ही परिषद विठ्ठलांजन मंगल कार्यालय(वडगाव शेरी )पुणे येथे होणार आहे.स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,तज्ज्ञ असे २० जण या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत.’तालानोआ’ हा फिजी शब्द असून सर्वंकष,सर्वसमावेशक आणि पारदर्शक संवादासाठी तो वापरला जातो.या परिषदेला त्या हेतूनेच ‘तालानोआ डायलॉग’ असे संबोधण्यात आले आहे.
Advertisement