विमानाने प्रथमच महिलांना काशीयात्रा, देविदास आप्पा तांबे यांचा उपक्रम
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०५ मार्च) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील भाजपचे युवा नेते देविदास तांबे आप्पा यांच्यावतीने परिसरातील महिलांसाठी काशी यात्रेचे आयोजन करण्यात आले. पुण्याहून या महिला काशी विश्वेश्वर याठिकाणी विमानाने दर्शनासाठी गेल्या या सर्व सोयीसुविधा व्यवस्था व विमान प्रवासाचे आयोजन देविदास आप्पा तांबे यांच्या वतीने करण्यात आले. प्रथमच या महिला काशी विश्वेश्वर यात्रेसाठी विमानाने प्रवास करून गेले. त्याचा महिलांनी वेगळाच आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करीत सर्व महिलांनी देविदास आप्पा तांबे यांचे मनापासून आभार व्यक्त केले. या सर्व यात्रेचे तसेच सोयीचे नियोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच एक आदर्श व्यक्तिमत्व तात्या शिनगारे यांनी केले. याबाबत शिनगारे यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, अशा प्रकारचा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच देविदास आप्पा तांबे यांच्यामुळे यशस्वी झाला, अनेक माता भगिनी यांना याचा लाभ घेता आला.
याचबरोबर युवानेते देविदास आप्पा तांबे यांच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच नागरिकांसाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, आधार कार्ड चे स्मार्ट कार्ड तसेच आधार कार्ड मध्ये दुरुस्ती वगैरे वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. हे सर्व उपक्रम चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास आप्पा तांबे यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आले. देविदास आप्पा तांबे यांच्या या उपक्रमांचे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात कौतुक होत असून याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.
विमान प्रवासात महिलांनी देविदास तांबे यांच्या या उपक्रमाच्या चर्चा व काशी मधील अनुभवाच्या गप्पा होत होत्या, यावरून “विमानात काशीच्या गप्पा आणि राहटणीत देविदास तांबे आप्पा” असे म्हणणे योग्यच ठरेल.