शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१६ एप्रिल) :- एक साथ नमस्ते मॅडम असे म्हणत एकत्र येऊन शाळेतील विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. आपले वय ,पद व प्रतिष्ठा ,आपल्या कामाचा व्याप बाजूला ठेवून चाळीसीकडे झुकलेले माजी विद्यार्थी उत्साहाने एकत्र जमले होते. अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटत असल्याचा आनंद तसेच आपण एकमेकांना ओळखतो की नाही ही मनातली भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण सर्व एकत्र येऊन आपली ओळख करून देत मोकळेपणाने आपल्या मनातल्या भावना व्यासपीठावर व्यक्त करीत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील निवृत्त शिक्षिका श्रीमती भारती हिंदळेकर, मुख्याध्यापिका प्रियांका बारसे शिक्षक रत्नाकर गायकवाड, मारुती पाटील, पाचपुते सर,केमसेसर ,दिंडेसर,ब्राम्हणकर सर,लढे मॅडम,औटी मॅडम,जाळींद्रेमॅडम,शिंगटेमॅडम,गडदेसर उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष कै.सु.ना. बारसे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहुन मनोगतातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनेक आठवणी जाग्या केल्या व कै.सु.ना. बारसे व त्यांच्या पत्नी कै.शकुंतला बारसे यांच्या मुळे आपल्या जीवनाला एक चांगले वळण मिळाले अशी भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केली.
या बॅचमधील अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर तर काही आर्मी मध्ये जॉईन झालेले आहेत. एक चांगली पिढी आपण घडवली अशी भावना 1987 पासुन आजपर्यंत असलेल्या मुख्याध्यापिका सौ.प्रियांका प्रविण बारसे यांनी व्यक्त केली.
या संस्थेत जॉईन झाल्यापासून आज पर्यंत सुमारे अकरा ते बारा हजार विद्यार्थ्यांना प्रियांका बारसे मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक विद्यालय यांनी भोसरीतील 11-12 हजार विद्यार्थ्यांना घडविले आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशभरातून 52 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. मागच्या पंधरा दिवसापूर्वी 1997 ते 1999 च्या बॅच मधील 85 विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे निमित्ताने एकत्र येऊन आठवणींना उजाळा दिला होता.