शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१९ एप्रिल) :- पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वांचे लाडके आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यांच्यावर बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लक्ष्मण जगताप यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या लाडक्या आमदारांनी लवकर बरे व्हावे, परत पूर्वीसारखे कार्यरत व्हावे, याकरिता त्यांचे चाहते विविध धार्मिक स्थळावर प्रार्थना करीत आहेत.
आमदार लक्ष्मण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो, याकरिता माजी नगरसेविका सौ मनिषाताई पवार यांच्या वतीने श्री सुर्यमुखी गणेश मंदिर,पवारनगर ,थेरगाव येथे गणपती अथर्व शीर्षाचे ११ आवर्तने पठण करण्यात आले.
भाऊ…..तुम्ही लवकर बरे व्हा! हीच ईश्वर चरणी प्रार्थना! अशी प्रार्थना ही करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पवार आणि नागरिक उपस्थित होते.