शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड / पुणे (दि.२७ एप्रिल) :- बँकांचे नक्त एनपीए चे प्रमाण ३% पेक्षा कमी राखनार्या पुणे जिल्ह्यातील बँकांचा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन दरवर्षी सन्मानचिन्ह देऊन गुणगौरव करत असते. श्री.गजानन लोकसेवा सहकारी बँकेस सन २०२०-२१ व २०२१-२२ चा उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन पुरस्कार नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात बँकेतर्फे अध्यक्ष श्री.मधुकर बाबर, उपाध्यक्ष रमेश वाणी यांचेसह संचालक दिलीप देशमुख, दिलीप सावंत, शंकर वाडकर, श्रीमती अनुराधा गोरखे, सतीश फुगे, अमित चौकडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक मंदार कुलकर्णी, शाखाव्यवस्थापक सुभाष पाटकर व राजेंद्र बाबर यांनी पुरस्कार स्वीकारला.