शबनम न्युज | मुंबई
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा शेवट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यांनतर आता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनीच गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. याआधी गोवा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नाही असंही सांगितलं.“आजच्या बैठकीत शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड करण्यात आली आहे. सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत आणि अधिकृत केलं आहे. पुढची रणनीती मुंबईत गेल्यानंतर ठरवून कळवली जाईल. नंतर मी पुन्हा गोव्याला जाणार आहे. सध्या दोन प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार मी तिकडे जात आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.