शबनम न्युज | पुणे
बालेवाडी,बाणेर,औंध, म्हाळुंगे व सुस या परिसरामध्ये डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, अशी मागणी मनोज रामचंद्र बालवडकर ( पाटील ) ( उपाध्यक्ष- पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) यांनी सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे साहेब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, परिसरामध्ये गेले काही दिवस डासांचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डासांच्या या वाढत्या प्रमाणामुळे परिसरा मध्ये डेंग्यू,मलेरिया या सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहेत.
तरी या डासांच्या वाढत्या प्रमाणावर आळा घालण्या साठी परिसरात प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे आहे. बालेवाडी,बाणेर,औंध,म्हाळुंगे व सुस या सर्व परिसरामध्ये धूर फवारणी तसेच औषध फवारणी केल्यास डासांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तरी यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करा, असेही सदर निवेदनात नमूद केले आहे.
यावेळी महेश बालवडकर , बाळा नेटके,अमित टकले व सुरज गच्चे उपस्थित होते.