शबनम न्युज | चिखली (प्रतिनिधी)
एक अज्ञात इसमानी १० हजार रुपये किमतीचा रेडमी नोट प्रो ८ मोबाइल जबरदस्तीने ओढून चोरी करून नेला असल्याची घटना शुभआंगण सोसायटी सेक्टर नं. १३, चिखली प्राधिकरण, पुणे बिल्डिंगच्या बाहेरच्या रस्त्यावर घडली. या प्रकरणी प्रवीण सुभाष लांजेवार (वय ४२, रा. चिखली प्राधिकरण) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच या प्रकरणी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी चालत असताना एक बुलेट मोटरसायकल ही त्यांच्याजवळ आली व त्यावर बसलेल्या एकाने फिर्यादीच्या उजव्या हातामधील १० हजार रुपये किमतीचे मोबाईल जबरदस्तीने ओढून भोसरी पुणे च्या दिशेने गाडीवर जोरात निघून गेला. या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कुदळे करीत आहेत.