दोन्ही पक्षाकडून विजयाचा दावा
शबनम न्युज | मुंबई
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
Advertisement
ऋतुजा लटके आणि मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र मिश्र लोकवस्ती असलेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये भाषिक समीकरण हे निर्णायक ठरणार आहे. या मतदारसंघात मराठी मतदारांचा टक्का सर्वाधिक असला, तरी इतर भाषिकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे विजय मिळवण्यासाठी उमेदवारांना योग्य भाषिक समीकरण जुळवून आणावे लागणार आहे.