शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व कल्पना राठोड, वैष्णवी इप्पर, मनीषा टाकडा व काजल फुंदसे यांच्या स्वागत गीताने झाली.प्रास्ताविक करतांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप बारी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून जीवनात शिक्षण घेत असतांना क कपाचा, क कम्प्युटरचा या बरोबरच क करिअरचा कसा महत्त्वाचा आहे याबाबत मत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक मा. श्री.योगेश बोरकर- प्रशिक्षक व समुपदेशक, मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, पुणे यांनी प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था भारतामध्ये कशी सक्रिय असून दिनांक ०१/११/२०२२ ते ०५/११/२०२२ या पाच दिवसात खालील महत्वपूर्ण बाबीवर प्रकाश टाकणार आहे या संदर्भात सविस्तर विवेचन केले. पदवी शिक्षणानंतर रोजगाराची संधी कशासाठी आवश्यक आहे त्यामुळे माणसाचे जीवन कसे परिपूर्ण होते यासंदर्भात विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले तसेच नोकरी करतांना भेडसावणाऱ्या समस्या उदा. आत्मविश्वासाचा आभाव , लाजाळूपणा, भीती, अज्ञान, दबाव यावर कशी मात करावी या संदर्भात कसे योग्य मार्गदर्शन मिळणार आहे याबाबत माहिती सांगितली. आयुष्य जगतांना टीम वर्क, निर्णय प्रक्रिया तसेच बुद्धिमत्ता कशी योग्य वेळी वापरली पाहिजे याबाबत विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी तरुण वर्गांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाविद्यालय प्लेसमेंट सेल व मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, पुणे या संस्थेसोबत सामंजस्य करार केलेला असून या कराराचा विद्यार्थी जीवनात कसा फायदा आहे या संदर्भात मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात प्लेसमेंटची आवश्यकता कशी महत्वपूर्ण आहे या संदर्भात भाष्य केले. जीवन जगतांना जीवनाची दिशा निश्चित करून मानवी मूल्यांची जपवणूक व आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला मा.श्री. राकेश गायकवाड- प्रोग्राम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाउंडेशन, मा.श्री. विकेश अडकणे- मोबिलाझर, मा.श्री. सुयश महेंदळे – मोबिलाझर, मा.श्री. किरण मोरे – प्लेसमेंट ऑफिसर, मा. श्री. दीपक पाटील – प्लेसमेंट ऑफिसर,प्रा. डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. माणिक कसाब, प्रा, शाहूराज येवते, प्रा. प्रा. डॉ. छाया जोशी,प्रा.यशोदा खुळखुळे, प्रा. सविता मानके, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. सोनाली अभंग, प्रा. सोनाली तापकीर व तृतीय वर्षातील कला,वाणिज्य, व बी.बी.ए.(सी.ए.) शाखेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.परमेश्वर भताशे यांनी केले उपस्थितांचे आभार प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.