चिंचवड विधानसभा मतदारसंघात झळकले फ्लेक्स
संपादकीय | रेहान सय्यद
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे नेते माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदार संघ लढविणार असल्याचे संकेत दिले आहे. संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे फ्लेक्स झळकत आहेत. नाना काटे हे आगामी चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे संकेत या फ्लेक्स द्वारे मिळत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर हे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेले शहर व कामगार नगरी आहे. मतदार संघात पिंपरी विधानसभा मतदारसंघ, भोसरी विधानसभा मतदारसंघ व चिंचवड विधानसभा मतदारसंघ हे विधानसभेचे मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात सध्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे आमदार आहेत. तसेच भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार महेश लांडगे आहेत, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचेच लक्ष्मण जगताप हे आमदार आहेत. या तिन्ही मतदार संघात चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असतो. चिंचवड विधानसभा मतदारसंघात मागील तीन टर्म आमदार लक्ष्मण जगताप यांचेच वर्चस्व राहिले आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे हे राष्ट्रवादीचा एक उमदा, सक्षम असा एक चेहरा आहे. नगरसेवक पदावर असताना, विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आपल्या प्रभागात उल्लेखनीय असे काम केले आहे. ‘प्रभागाचा विकास’ हेच एक ध्येय समोर ठेवून विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपल्या प्रभागाचा विकास करून एक विकासात्मक प्रभाग कसा असावा, हे संपूर्ण शहराला दाखवून दिले आहे. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पदावर असताना विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेऊन विकासात्मक कामे पूर्णत्वास नेली आहे. भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता असताना, महानगरपालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचारा विरोधात तसेच चुकीच्या कामा विरोधात त्यांनी प्रखरपणे आपली भूमिका मांडली व विरोधी पक्षनेता कसा असावा, हेही संपूर्ण शहराला दाखवून दिले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, शिवसेनेचे राहुल कलाटे यांच्या बरोबरीनेच राष्ट्रवादीचे विठ्ठल नाना काटे यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. २०२३ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना माजी नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात शुभेच्छांचे फ्लेक्स लावले आहे. या फ्लेक्सच्या मार्फत आगामी काळात आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे संकेत दिले आहे.
विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी शहरवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, फ्लेक्स वर “स्वप्नांना देऊ नव्या संकल्पचे रंग, प्रगतीच्या प्रकाशनाने उजळवू आपला चिंचवड मतदारसंघ” या आशयाचे फ्लेक्स लावत शुभेच्छुक श्री विठ्ठल उर्फ नाना काटे- नेते चिंचवड विधानसभा असा मजकूर फ्लेक्स वर झळकविण्यात आला आहे. यावरून विठ्ठल उर्फ नाना काटे हे आगामी चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहे.
नाना काटे यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विधानसभा मतदार संघ लढविला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून विठ्ठल उर्फ नाना काटे हे तिसऱ्या क्रमांकाचे जास्त मतदान घेणारे उमेदवार ठरले होते. २०१४ मध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व चिंचवड विधानसभा मतदार संघ जिंकला, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे राहुल कलाटे हे होते.
विठ्ठल उर्फ नाना काटे हे राष्ट्रवादी पक्षाचे शहरातील एक सक्षम नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.आगामी येणाऱ्या काळात चिंचवड विधानसभा मतदार संघाचा विकास हा एकच ध्येय समोर ठेवून चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या प्रगतीचा आराखडा नाना काटे नक्कीच उंचावतील यात शंका नाही. याच विकासात्मक धोरण व इच्छेतून विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार असल्याचे संकेत या नवीन वर्षाच्या सुरुवातीला फ्लेक्स द्वारे दिले आहे.